पथावर
*****
कधी दिसे वाट कधी रे अंधार तुझ्या पथावर चालतांना ॥१
कधी तो प्रकाश डोळा दिपणारा
जग तुटणारा क्षणभर ॥२
जगाचा कालवा कधी कानावर
वाट अर्ध्यावर सोडू वाटे ॥३
सरू आले त्राण गात्र थकलेले
मन आसावले मुक्कामाला ॥४
सवे वाटसरू सखे प्रियकर
भार खांद्यावर टाकलेले ॥५
तया नेणे पार कर्तव्य ते एक
दिले तूच नेक पार पाडे ॥६
तूच चालविता तूच थांबविता
अन्यथा विक्रांता काय येते ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा