भाग्यवान
********
सुटूनिया लोभ भय हरवावे सुखही कळावे मोहमयी ॥१
चालावे उदास कळून जीवास
सांडून सायास सुरक्षेचे ॥२
हवाय कुणाला जमीन जुमला
बॅलन्सी भरला वेडेपणा ॥३
शून्यात उगम शून्यात मुक्काम
शून्यात विराम ठरलेला ॥४
सारूनी पडदा मजलागी दत्त
सदा दावी तथ्य पुन्हा पुन्हा ॥५
विक्रांत भाग्याचा दत्ताने धरला
जगाचा सुटला बंदीवास ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा