कोळी
*****
एक एक विचाराचा तंतू तंतू विणतांना क्षणात ते कोळीजाळे मुखातून काढतांना ॥
हरखला कोळी वेडा आणि विश्वाकार झाला
माझे पण ऐसे व्याला तंतूमध्ये रिझु गेला ॥
एक एक विचाराचा तंतू तंतू पाहताना
हरवले कोळी जाळे स्वस्थानात पुन्हा आला ॥
मनातील तंतु त्याचे तंतूमय जग होते
तेच त्याचे कारकत्व गंतव्यही तेच होते ॥
मग पक्षी ग्रास झाला सरड्याच्या पोटी गेला
व्यक्ताव्यक्त जगताचा जड भास फक्त गेला ॥
पक्षी तोच सरडाही शिकार तो शिकारीही
मरणारा मारणारा नव्हते तेथे कोणीही ॥
नसलेल्या जगताचे असणे पण निमाले
नसलेपण पुनरपि नाही होत मिरविले ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा