कुणीतरी
*******
कुठेतरी कुणीतरी काय असेल पाहत वाट दिनरात माझी प्राण आणून डोळ्यात ॥
कुठेतरी कुणीतरी काय असेल मोजत
दिस हातावर बोटी मनी व्याकुळ रे होत ॥
कुठेतरी कुणीतरी काय असेल जाणत
माझे जळते हृदय शोध जन्माचा शाश्वत ॥
कुण्या दुरच्या शहरी आडबाजूच्या गावात
व्याज जन्माचे कुण्या मज देण्यास परत ॥
माझे जळते प्रारब्ध दशा चालती अज्ञात
काय असेल संपले मज नाही रे कळत ॥
कुणीतरी कुठेतरी माझे आकाश रे होत
काही कळल्या वाचून मज घेईल मिठीत ॥
कुठेतरी कधीतरी प्राण विसावा तो श्रेष्ठ
सखा जिवलग प्रिय माझा पुरवेल हेत ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा