ज्ञानदेवा
*******
शब्द प्रकाशाचे ज्ञानदेवा तुझे
करी जीवनाचे
सोनें माझ्या ॥१
तुझिया प्रज्ञेचा
प्रकाश किरण
हृदयी झेलून
धन्य झालो ॥ २
अर्थाचे रुजून
सौंदर्य चित्तात
एकरूप त्यात
बुद्धी झाली ॥३
भ्रांतीचा काळोख
फिटून मिटून
आनंद दाटून
मनी येई ॥ ४
विक्रांता पदाशी
घेई गा ठेवूनी
हीच विनवणी
वारंवार ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा