होळी
*****
आग पेटली पेटली ज्वाला नभामध्ये गेली रात्र नटली सजली ठिणग्यांनी ॥१
गंजी पेटली धडाड लाल केशरी उजेड
झाली सजीवशी झाडं चहुकडे ॥२
उठे गलका चित्कार बोंबा शिव्या भरपूर
पडे जगाचा विसर अवघ्यांना ॥३
कुणी नैवेद्य आणला कुणी नारळ वाहिला
राख लावली भाळाला कुणी भावे ॥४
वृक्ष जळतांना ओला कुणी हुंदका ऐकला
कुठे ओलावला डोळा जीवनाचा ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा