शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

आलीस तू


आलीस तू
********:
आलीस जीवनात तू
होउनिया मधु ऋतु 
किती वाणू सखी तुला 
स्वर्ग माझा झालीस तू ॥

लाखो सलाम तुजला 
सखी लाखो कुर्निसात 
देऊ धन्य वाद किती 
जीव तुझ्या पावुलात ॥

चांदण्याचे मन झाले 
श्वास सुगंधाचे रान 
ये माधुर्य आकाराला 
जीव झाला हा कुर्बान ॥

मोहरून कणकण 
जणू झालो आम्रवन 
रूप रस गंध रंग 
तृप्त झाले हे जीवन ॥

तुझ्यासाठी जन्म झाला 
तुझ्यासाठी हे जीवन 
वांछा मनी हीच यावे 
तुझ्या कुशीत मरण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ती प्रकार

भक्ती ****: धनिकाची भक्ती देव रावुळात  राहे मिरवत ऐश्वर्याने ॥१ रत्न हिरे मोती बहुत सजती  पहारे बसंती शस्त्रधारी ॥२ परी ती ही अस...