शुक्रवार, १७ जून, २०२२

जीव

जीव
***:
तू सांगायचीस 
एक गोष्ट मला 
पोपटात जीव 
असलेल्या राक्षसाची
अन मी हसायचो 
म्हणायचो
असे कुठे असते का ?
एकाचा जीव 
दुसऱ्यात राहतो का ?
तू चिडायचीस रागावयाचीस 
अन म्हणायचीस  
आई कधीच खोटं बोलत नाही !

मग एक दिवस 
तू गेलीस दूर निघून  
घर शहर सोडून . .
तेव्हा मला पटले 
तुझी आई 
खरं तेच सांगायची 
एकाचा जीव 
दुसर्‍यात असतो ते !
राक्षसाचा जीव 
पोपटात असतो ते !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्ता येई रे

दत्ता येई रे ******** दत्ता येई रे भक्ती देई रे  मज नेई रे तुझ्या गावा ॥१ धन नको रे मान नको रे  शान नको रे जगतात ॥२ तुला पहावे ह...