शुक्रवार, ३ जून, २०२२

घसरण




घसरण
******

जर दोन अडीचशे 
करून गिरनार 
कुणाच्या कामना 
नसतील जाणार 
तर मग कशाला 
हव्यात या भानगडी 
रहावे घरीच आपल्या
सांभाळत लफडी 

कशाला करावा सोस
शेकडो प्रवचनांचा 
कशाला धरावा हट्ट 
पुस्तक लिहिण्याचा 

मान्य, सहज भुरळ 
घालतात सुंदर स्त्रिया 
मान्य, घसरायला 
होतेच तिथे लीलया 
अन ते क्षमापित ही 
केले जाऊ शकते 
आमच्यासारख्या 
सामान्य जनाला 

पण तुम्ही महाराज 
जेव्हा बसत असता
देवतांच्या शेजारी 
घेऊन अनुभुतीचि 
भली मोठी शिदोरी 
तेव्हा ते पचत नाही 

कदाचित ती शिदोरीही 
खोटीच असावी 
याची खात्री होऊ लागते 
परिकथेतील चमत्कारिक 
गोष्टींची आठवण येऊ लागते 

आणि ते तथाकथित 
करोडोंचे याग 
उभे करतात पुढे 
प्रश्नचिन्हांची धग 

महाराज तुमचे हे 
असे घसरणे
असे विवादास्पद होणे
 करून टाकतात 
आमची दिव्य स्वप्न 
छिन्नभिन्न
ज्याला आपण समजत होतो   
देवाचे निकेतन 
तेच कुणाचे तरी  
निघावे दुकान
हे पचवणे
खरंच किती कठीण असते

आणि त्या गोष्टी 
ते अनुभव पूजन ते अर्चन 
ते देऊळ बांधणे वगैरे वगैरे 
सारेच भंकस वाटू लागते

जिथे वैराग्य 
तिथेच ज्ञान असते 
जिथे ज्ञान असते 
तिथेच भक्ती उगवते 

तर मग  महाराज 
एक सल्ला ऐकाल का ?
तुमच्या त्या कथाची 
उतराई म्हणून सांगतो

खाली उतरा
बुवा असल्याची झुल 
दूरवर फेकत
बसा सगळयांच्या सोबत 
मान्य करत 
आपली कमतरता 
इतरा सारखेच
देवाला नमत 
आपले अपराध स्वीकारत 
हातून न होण्याची 
करूणा भाकत

कदाचित हीच असू शकते 
परिमार्जनाची चावी
साऱ्या पापांची

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

२ टिप्पण्या:

  1. उत्तम कविता,पण वर्णनावरून असे वाटते की ठराविक एक व्यक्तिमत्व समोर ठेवून काव्य लिहाल आहे,किंवा कदाचित माझ्या मनात जे व्यक्तिमत्व आहे त्याला तंतोतंत योग्य असलेने मला असे वाटत असेल. 👌👌💐💐

    उत्तर द्याहटवा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...