जुगार
******
खेळलो बहुत खेळ हा शब्दांचा भक्तीचा प्रेमाचा दत्तात्रेया
फिरवून शब्द तेच मागितले
अक्षरी घोटले प्रेम तुझे
पाहियली स्वप्ने मनाच्या मुक्तीची
नि:संग चित्ताची पुन्हा पुन्हा
लाविले पणास अवघे जीवन
पाठ फिरवून आकांक्षांना
फुका गेला डाव बहुदा खेळून
जाणार येथून रिक्त हस्त
सारेच जुगारी कुठे जिंकतात
तरीही येतात खेळायला
जिंकण्या तुजला येईल परत
राहिल खेळत विक्रांत हा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘१८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा