शनिवार, ५ मार्च, २०२२

नि‌‌र्बुद्ध भक्ती

नि‌‌र्बुद्ध भक्ती
*****

भक्ती काय कधी निर्बुद्ध असते
टाळ जी कुटते मख्खपणे॥१

भक्ती पेटलेली ज्योत एक असते
कृपेने तेजाळते अंतरात॥२

कुठे नसे तेल प्रेम भावनांचे 
चारित्र्य वातीचे पिळदार ॥३

म्हणुनिया उगा दिसते ती क्षीण 
दीप्ती मीणमीण गमतसे ॥४

पेटविता ज्योत तोच देतो तेल 
आडोसा सांभाळ करीतसे ॥५

भक्तीचे आभाळ भक्तालाच‌ ठावे 
इतर पहावे आढा छत ॥६

विक्रांत भक्तीला मिरवितो माथा 
हेतू विन दत्ता आठवतो ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वप्नझाड

स्वप्न झाड ******** तशी तर तू भित्रीच  पण एक धाडस  केलेस चांदण्याचे एक झाड  माझ्या दारी  लावलेस झाड तुझे होते की माझे  मला कधीच ...