रविवार, २० मार्च, २०२२

सहिष्णुता


 सहिष्णुता मूर्खपणा 

*****:*********

हे युद्ध माणसांचे 
जोवर होत होते
जमिनीच्या तुकड्यासाठी 
तोवर ठीक होते 

मुंग्या ही भांडतात 
अन मरतात  
वाघ सिंह ही  
लढतात मरतात 

तसेच हद्दी-
परिसरासाठी
माकडे अन् कुत्रेही 
लचके तोडतात 
एकमेकांचे

तोवर ठीक होते 

त्यात माणसाचे 
पशुत्व शाबीत होत होते 
पण श्रद्धांचे विद्रूपीकरण करून
देवाचे नाव घेऊन 
मारतात 
माणसेच माणसाला 
प्रेषितांची वचने 
मोठ्याने वदून 
यापेक्षा मोठी अमानुषता 
कुठली नसेल 

मानवतेहून मोठा धर्म नाही 
प्रेमाहून मोठे सौंदर्य नाही 
मैत्रीहून काही आनंददायी नाही 

तरीही इथे
सहिष्णुतेचे पाठ म्हणावे 
अन मानेवर 
तलवारीचे वार घ्यावे
या पेक्षा मोठा मूर्खपणा नाही !


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.






२ टिप्पण्या:

  1. सहमत प्रत्येक मताशी ,पण मग काय करावे बरे?Tit for tat ने काही साध्य होइल का? माणसाच्या मनातील माणूस जगवता च येणार नाही का?

    उत्तर द्याहटवा
  2. हे खरे आहे कि जगात शांती नांदावी .मागील सारे विसरून, जसा जिथे जो असेल तिथे तो सुखीही असावा, पण इतिहास सांगतो असे कधीच होत नाहीय . कारण जग त्रिगुणाने बनले आहे .तमोगुण नाहीसा होणार नाही . सत्व रज तम हातात हात घालून चालत आहेत .सत्व वाढवावा म्हणून संत प्रयत्न करतात ते करणे भाग आहे .पण आपण सावध असावे सशस्त्र असावे स्व चे रक्षण करावे ,

    उत्तर द्याहटवा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...