शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

उगमी


उगमी
*****

चाललो उगमी 
माघारा मी आता
धरूनिया हाता 
दत्ताचिया ॥

थांबलेले मन 
जगाचे चलन 
अहंचे स्फुरण  
एक मात्र ॥

पाही एकटक 
जाणिवेचा डोळा 
होवून आंधळा 
जगताला ॥

नादान जगणे 
सहज कळले 
मेंदूत पेरले 
कार्यक्रम ॥

विक्रांत नमितो 
विक्रांता लवून 
विक्रांत मरून 
जात आहे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वप्नझाड

स्वप्न झाड ******** तशी तर तू भित्रीच  पण एक धाडस  केलेस चांदण्याचे एक झाड  माझ्या दारी  लावलेस झाड तुझे होते की माझे  मला कधीच ...