गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

आदी शक्ती

आदिशक्ती
*********

चित्ताची जाणीव 
चैतन्य राणीव 
जिवाचीही जीव 
आदिशक्ती ॥

खेळे महाभूती 
माय कुंडलिनी 
रूप रस गुणी 
साकारूनी ॥

प्राणाची वाहणी 
करे माऊली ती 
निरपेक्ष रीती 
भूत मात्री ॥

मनपवना च्या 
राहुनिया संधी 
पांघरुनी गुंथी 
अज्ञानाची ॥

माय मी आंधळा 
आलो तुझ्या दारा 
डोळीयांचा सारा 
दूर करी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माय

माय **** ठेवताच हात  माय माथ्यावर  आलो भानावर  जागृतीच्या  झालीस कृपाळू  आई भगवती  चैतन्याच्या वाती  कणोकणी  ओस जगण्यात  स्वानंद...