सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

हाका मारी


हाका मारी
*********

काय माझ्या हाती 
होते जन्म घेणे 
वाढणे जगणे 
जगती या ॥

मीच मला भ्यालो 
चाकरी लागलो 
गुलामी रंगलो 
देहाच्या या ॥

सले उगमाचा 
अंकुर आतला 
म्हणून शोधाला 
जीव निघे ॥

तुटलेल्या वाटा 
रान चोहीकडे 
रुतलेले कोडे 
पाऊलात ॥

कोणीतरी पण 
गेले रे इथून 
तयाला थांबून 
हाकामारी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वप्नझाड

स्वप्न झाड ******** तशी तर तू भित्रीच  पण एक धाडस  केलेस चांदण्याचे एक झाड  माझ्या दारी  लावलेस झाड तुझे होते की माझे  मला कधीच ...