शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

गूढध्वनी




माझिया ओठात 
शब्द फुलतात 
आपुल्या नादात 
आपोआप ।।१
ज्ञानोबा तुकोबा 
गुज वदतात 
कानी सांगतात 
गूढध्वनी।।२
तयांचे उच्छिष्ट
मज महाभोग
सरे भवरोग
सहजची ।।३
नच शब्दासाठी 
थांबत मी कधी 
व्यर्थ उचापती 
करीत गा।।४ 
वृत्त मात्रा छंद
वाहून जातात
अनावर होतात
भाव जेव्हा ।।५ 
विक्रांता आवडे 
शब्दांचा पसारा 
मोकळा भरारा 
रान वारा ।।६ 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मारूत

मारुत ******  एक रुद्र हुंकार भेदत  जातो सप्त पर्वत  पृथ्वी आप तेज वायू  सारे आकाश व्यापत  थरथरते धरती ढवळतो सागर  उफाळून लाव्हा...