कृष्णाकाठी
औदुंबर
तिथे माझे गुरुवर
श्रीनृसिंह सरस्वती
भक्त प्रेमी यतिवर
||
काय वर्णावे ते
स्थान
ज्या भाग्याचे
वरदान
माता योगिनी
येवून
नित्य करिती
स्तवन ||
प्रभू रमले ज्या
ठायी
धन्य भूमी तो
किनारा
उर्जा असीम
प्रक्षेपी
पद्खुणांचा
गाभारा ||
तया ठायी
प्रवेशिता
मन विसरे संसारा
नाव गाव पद सारे
गमे मातीचा ढीगारा
||
विक्रांत
प्रार्थितो दत्ता
जन्म सारा जावो इथे
पुन्हा जरी येणे
पडे
जन्म अन्य नको
कुठे ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा