गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

देवाच्या कारणे






घडो हे जगणे
देवाच्या कारणे
बाकी देणे घेणे
उरो नये ||
देहाची वासना
ठेवली बांधून
संपले म्हणून
काम तिचे ||
मनाची या हाव
मनालाच ठाव
कळला उपाव
त्याचा आता ||
वाहियले फुल
जैसे प्रवाहात
देवाच्या दारात
तैसे मी पण ||
आता  तरंगणे
अथवा बुडणे
जगणे मरणे
सोपस्कार ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

   

२ टिप्पण्या:

सुखाचे कोडींग

सुखाचे कोडींग *************** त्याच त्या सुखाच्या दीर्घ वर्तुळात  धावत असे जग दुःखांना टाळत. त्याच पुन्हा देवतांना नमन करत  तेच ...