मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

स्वाती राजोपाध्याय..(एक निरोप)





स्वाती नक्षत्रात पडणारे पावसाचे थेंब
शिंपल्यात मोती होतात
स्वातीच्या सहवासाचा आणि अस्तित्वाचा
हा योग सर्वजन जाणतात
स्वाती राजोपाध्याय यांच्या सहवासातही
आपल्याला दिसतात आणि आपल्यात उमलतात
त्यांचे शुभ्र धवल मोतियासारखे गुण

निरपेक्ष प्रेम, आनंद, चारित्र्य
प्रामाणिकता आणि कर्तव्य समर्पण
प्रसिध्दीपासून सदैव दूर
आपण आणि आपलं काम बरं
या भूमिकेत सहज सदैव वावरत
आपलं काम चोख करत
त्या  राहिल्या सदैव आपल्यात
एखाद्या सेवाव्रतीगत

राजकारण करणं कुणाशी भांडणं
छक्केपंजे खेळणं लावालावी करणं
या गोष्टी त्यांच्याजवळ
कधीही फिरकल्याच नाही
नव्हे त्यांची सावलीही त्यांच्यावर
कधीही पडली नाही
असं हे शांत सोज्वळ सहज जीवन
आजवर आपला एक अविभाज्य भाग होतं
पानाआड दडलेल्या फुलासारखं
सुगंधित अध्यात्मिक आत्ममग्न
हजारो लोकांच्या उपयोगी पडलेलं
अन सगळ्यापासून अलिप्त असलेलं
आपण खरच नशीबवान होतो
त्यांच्या सोबत काम करीत होतो .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...