मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

तुटलेला उंबरठा




जडावले पाय पुन्हा 
घराकडे वळतांना 
तुटलेला उंबरठा 
अडखळे पावूलांना 

तीच गाथा तीच व्यथा 
तेच शब्द जळलेले 
तेच मिष तेच विष 
तेच रक्त करपले  

कसा आणि किती वेळ 
खेळ असा चालणार 
एक एक दिस भार 
घाव वृक्ष साहणार 

अंतहीन गोष्ट जणू 
वेताळाची जन्मभर 
मर मर  रोज मर 
मनातल्या चितेवर 



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...