मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०१४

वळू आणि मी






आज काल मला
फार हेवा वाटतो
तुझ्या हाताखाली
काम करणाऱ्या
त्या वळूचा..
काय नशीब
आहे लेकाचं
सारखा तुझ्याभवती
फिरत असतो
तसा मला त्याचा
फार रागही येतो
जेव्हा ,
तुझं लक्ष नसतांना
तुझ्यावरून तो
तशी नजर फिरवतो
तेव्हा..
तू म्हणतेस,
किती नजरांना
थोपवशील तू असा
अन मी पुन्हा
तपासून पाहू लागतो
माझी नजर
तुझ्यावरची

विक्रांत प्रभाकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुकडा काळाचा

तुकडा काळाचा ************ एक तुकडा काळाचा  तोंडावर फेकलेला  असते जीवन आपले फक्त फक्त जगायला एक कागद तेलकट  सुखदुःख गुंडाळला   धर...