सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

तुझ्यासाठी जन्मसारा






सखी माझी प्रीत आहे
रानातील वेडे गाणे
पानोपानी चैतन्याचे
कणोकणी बहरणे

वेडे खुळे झाड थोडे
रुपाकडे पाहू नको
छाया फुले बरसती
दूरवर जावू नको

सारे काही तुझ्यासाठी
मन खुळे रानफुले
तुझ्यासाठी अंथरले
हृदयही दव ओले

सजूनिया आला ऋतू
किती काळ ठाव नाही
तुझ्यासाठी जन्मसारा
तुझ्यासाठी मरणही

विक्रांत प्रभाकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वरदान

वरदान ****** उगा उगाच पथात पाऊस पडुन गेला  थकल्या जीवा तजेला क्षणात देऊन गेला    मागेपुढे होता दग्ध रखरखाट सारा  व्याकुळले प्राण...