गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

कविता




तू होतीस तेव्हा
कविता सुचत नसे
तुझ्यावाचून मजला
दुनिया दिसत नसे
आता तू नाहीस
दुनिया सताड दिसते
सारीकडे तुझ्या खुणा
तुझीच आठवण असते
ते तुझे स्मृती विभ्रम
कधी आकारा येतात
त्या माझ्या शब्दास
लोक कविता म्हणतात


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...