सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

बाळासाहेबांना




वर्ष उलटून गेलय तरीही
घाव अजून सुकलाच नाही .
त्या पोकळीत हृदयाच्या
शोक अजून मिटलाच नाही .
फडफडणारा भव्य भगवा
अजूनही हसलाच नाही .
त्या शब्दास्तव कान अधीर
विरह हा मिटलाच नाही .
मना सांगतो मीच माझ्या
रे दु:ख तुझे बेकार नाही .
त्या दु:खाचा कडवट घोटच
दुसरा तुज आधार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...