बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

देहाच्या वाटेने





देहाच्या वाटेने भेटलो देवाला
काफिला चालला इंद्रीयांचा ||१||
भोगता भोगता भोगणे पाहिले
भोगणे सुटले आपोआप ||२||
स्वरूप सावळे अवघे जाहले
आशेचे सुटले करपाश ||३||
आताही चालतो जरी तीच वाट
परी वहिवाट मोडीयली ||४||
मिटले सायास  जाहलो निवांत
नर्मदेचा काठ आत्मतृप्त ||५||

विक्रांत प्रभाकर  
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...