नव्वद टक्के जळलेली
तरीही ती जिवंत होती
जळलेल्या नसा सोबत
वेदनाही जळली होती
पूर्ण शुद्धीत सारे ओळखीत
करीत होती विनंती
डॉक्टर मी वाचेल ना हो ?
घरी पुन्हा जाईल ना हो ?
जीव नसलेला एक होकार
डॉक्टर देत होते
व्हेने सेक्शन केथेटर
यांत्रिकपणे होत होते
जीवघेणे आर्जव तिच्या प्रश्नातले
सारी यांत्रिकता खरवडत होते
विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा