श्री दत्त कृपाळू
दाता
मज धरुनिया हाता
झाला मार्ग
दाखविता
अतिप्रेमे ||
मी बोलविता धावला
तू असशी माझा वदला
मम हृदयाकाशी
बैसला
विराजुनी सदा ||
त्या चुकल्या
वळणावरती
जग तुटल्या
कड्यावरती
ती होती मजवर
प्रीती
म्हणुनी जगलो ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा