जर तू प्रेम केले असेल
तर तुला भक्ती कळेल
अन्यथा हारफुलांचे उगा
ते एक नाटक ठरेल
प्रेमामध्ये प्रियेसाठी
सर्व काही देणे असते
मिळो न मिळो काही
दिनरात झुरणे असते
तिच्या आठवणी दिनरात
काळीज उगाच हुरहूरते
ते जर कधी घडले असेल
तरच हे हि शक्य होते
प्रिया प्रसन्न होईल
याची मुळी खात्री नसते
आपली प्रेमपत्रे याचना
कचरा पेटीत जमा होते
तरीही प्रेम तिच्यावरले
तसेच आत कायम राहते
निरपेक्ष उत्कट भावना
हीच भक्ती असते
जर तू प्रेम केले असेल
तर तुला हे जमेल
अथवा गीता वेदांतातील
पोपट बनणे उरेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा