शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

बोललो तितुके





आता कैसे गावू | सांग तुझे गुण |
चाकाटले मन | शब्दहीन ||१ ||
बोलू जाय तरी | श्वास कोंदाटून |
राहे अडकून | अंतरीच ||२ ||
लिहू जाय तरी | जातात वाहून |
अक्षरे भिजून | आसवांनी ||३||
बोललो तितुके | तुझेच कौतुक |
दुबळा वाहक | वावटळी ||४ ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुर्लभ

दुर्लभ ***** तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ  मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१ ज्याची कुळवाडी असे देवभक्ती  सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२ ज...