शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

गाभारा


घेवूनी जीव धगधगणारा
पिसाट उरी धुमसणारा
येवूनी बसलो क्लांत अंतरा
वेशीजवळील पुरान मंदिरा
खोलगट अंधारा निस्तब्ध गाभारा
धुळीच्या भस्माचा विरक्त पसारा
सुकलेली फुले कोरडला दिवा
किंचित ओलसर दगडी गारवा
मनात भरला सुखद शहारा
अंतरा मिळाला शांत निवारा
घुमटात निळा पारवा घुमला
क्षोभाचा सारा मेघ निवळला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अंगणात

अंगणात ****** अंगणात तुझ्या येणार मी नाही दारात उगाच थांबणार नाही लाडीगोडी मुळी लावणार नाही  उगा गुण गाण गाणार ही नाही  वाटते का...