जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शनिवार, ३० जुलै, २०१६
शुक्रवार, २९ जुलै, २०१६
तुझे गीत मला दे रे ...
माझे शब्द तुला घे
रे
तुझे गीत मला दे रे
अनंता हे अवधूता
असे खूळ मना दे
रे
आकाशात दाटलेले
होवूनिया जळ ये
रे
पानोपानी बहरले
आनंदाचे गाण दे
रे
चालतांना पावुलात
रामकृष्ण रव दे
रे
पहुडता माळावरी
निळे निळे खेव दे
रे
सावळेसे स्वप्न
तुझे
मिटावे ना कधी
बरे
प्राणात या
एकारले
भास तुझे व्हावे
खरे
अंत मागण्याचा
झाला
शब्द हरवले सारे
मौन उत्थान मनात
कुठे विक्रांत पहा
रे
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
बुधवार, २७ जुलै, २०१६
दत्ताच्या चरणी
दत्ताच्या चरणी
विक्रांत मूर्धनी
ओघळून पाणी
विसावले ||
कृपा की करुणा
क्षमा संवेदना
काहीच कळेना
पदलीना ||
मूर्तीत अमूर्त
चैतन्य प्रकट
भव्य आकाशात
उमटले ||
साधनेत रत
डोळीयात दत्त
नाम स्मरणात
गेले क्षण ||
जागृती थिजली
स्वप्नात भिनली
क्षण उजळली
अंतर्बाह्य ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
दिगंबर आजबे
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...


