जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शनिवार, ३० जुलै, २०१६
शुक्रवार, २९ जुलै, २०१६
तुझे गीत मला दे रे ...
माझे शब्द तुला घे
रे
तुझे गीत मला दे रे
अनंता हे अवधूता
असे खूळ मना दे
रे
आकाशात दाटलेले
होवूनिया जळ ये
रे
पानोपानी बहरले
आनंदाचे गाण दे
रे
चालतांना पावुलात
रामकृष्ण रव दे
रे
पहुडता माळावरी
निळे निळे खेव दे
रे
सावळेसे स्वप्न
तुझे
मिटावे ना कधी
बरे
प्राणात या
एकारले
भास तुझे व्हावे
खरे
अंत मागण्याचा
झाला
शब्द हरवले सारे
मौन उत्थान मनात
कुठे विक्रांत पहा
रे
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
बुधवार, २७ जुलै, २०१६
दत्ताच्या चरणी
दत्ताच्या चरणी
विक्रांत मूर्धनी
ओघळून पाणी
विसावले ||
कृपा की करुणा
क्षमा संवेदना
काहीच कळेना
पदलीना ||
मूर्तीत अमूर्त
चैतन्य प्रकट
भव्य आकाशात
उमटले ||
साधनेत रत
डोळीयात दत्त
नाम स्मरणात
गेले क्षण ||
जागृती थिजली
स्वप्नात भिनली
क्षण उजळली
अंतर्बाह्य ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
शांताराम महाजन सिनीअर फार्मासिस्ट निवृत्ती दिना निमित्त .
शांताराम महाजन सिनीअर फार्मासिस्ट निवृत्ती दिना निमित्त . ************ मुंबई महानगरपालिकेत काही भाग्यवान विभाग आणि कर्मचारी आ...
-
शांताराम महाजन सिनीअर फार्मासिस्ट निवृत्ती दिना निमित्त . ************ मुंबई महानगरपालिकेत काही भाग्यवान विभाग आणि कर्मचारी आ...
-
१५ ऑगस्ट निमित्त -भारत देशास ************************** हे माझ्या सुंदर देशा तुझ्यासाठी मी फारसे काही करू शकलो नाही. घरदार संस...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
कोरे पान ******** बोल सखीचे चैत्र चांदणे नसून शब्दी उगा सांडणे गूढ नव्हते गुपित काही झऱ्यागत ते मुक्त वाहणे काही घटना काही घड...
-
विठ्ठल दर्शन (आषाढी) ***************** पाहिला मी देव उभा विटेवर सावळा सुंदर मनोहर पाहिला ना वेष नच वा मुकुट चंदनाचा नीट गंध उभ...
-
शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...
-
इथे तिथे ******* रे ते गाव माझे होते की हे गाव माझे आहे मज कळेना काहीच हे भास कशाचे आहे तिथे खूप यातायात होते चालणे उन्हात पण...
-
जगदीश महाराज (झगडीया मढी) नर्मदाकाठच्या कविता *************************** निर्मळ डोळ्यांचा मधुर वाणीचा नर्मदा तीरीचा साधू एक ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
समाधान ******* असे समाधान थेँब अमृताचा प्राण साधनेचा साधकाच्या ॥१ समाधानाविना येथे येते न रुजून ध्यान हे सजून अंतरंगी ॥२ शांती...


