रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

आरोग्य व्यापारी !!







ते ठरवणार
आम्ही
कुठले औषध वापरायचे ते  !

ते ठरवणार
आम्ही
कुठले तपास करायचे ते !

ते ठरवणार
आम्ही
आम्ही लोकांना कसे
वाचवायचे ते !

ते ठरवणार
कुणी मेल्यावर
आम्हापैकी कुणाला
बकरा बनवायचे ते !

त्यांच्या अथवा
त्यांच्या कुणाच्या
कंपण्या अश्याच
चालू राहतील

ठरलेल्या ओझ्याची
ठरलेली खोकी
ठरलेली पाकीट
ठरलेल्या ठिकाणी
अचूक   
पोहचत राहतील

फार काही झाल तर
मेडीयात आल तर
ते ब्लॅकलिस्ट होतील  
अन बाजारात
नव्या नावानं
पुनःपुन्हा
अवतरतील   
....
त्यांच्या मते
जीणे गरिबाचे
फार महाग नसते
रडणाऱ्याचे रडू
हजार लाखात
सहज थांबते
(काहीजनासाठी तर
ती ही एक
लॉटरी असते!)

विक्रांत प्रभाकर

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

डास चावता





मला चावून
रक्त पिवून
माझ्या हातून
मेला डास ||

जरी तो सुटला  
चिंता मजला
देवून गेला
नको नको ती  ||

टम्म फुगला
होता साला   
नकळे आला
होता कुठूनी  ||

हे रक्त माझे   
का आणि कुणाचे
असतील कश्याचे
जंतू त्यात ||

रोग येतात
लोक मरतात
काय हातात
या लोकांच्या ||

मरणे आमुचे
जगणे आमुचे   
चक्र जगाचे
राम भरोसे ||


विक्रांत प्रभाकर

..बाईकवरची ती...





स्पर्श सख्याचा
स्पर्श सुखाचा
मोहरलेल्या
वृक्ष फुलांचा

पाठीवरती
विसावलेला
देह सखीचा
गाडीवरला

नव्हते वारे
नव्हता नाद
जणू निरव
धुंद एकांत

मिटून डोळे
ओठ हसरे
ती वाऱ्यावर
जगणे सारे

विक्रांत प्रभाकर

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...