ज्ञानदेवा - प्रार्थना
***************
उगमाला ओढ सदा सागराची तशी ह्या जीवाची दशा होय॥१
नुरो माझेपण उरो तुझेपण
घडो समर्पण ऐसे काही ॥२
सरो माझी वाट तुझ्या आळंदीत
वळणे परत घडू नये ॥३
सरो माझे श्वास तुझ्या गाभाऱ्यात
देह निर्माल्यात जमा व्हावा ॥४
अस्तित्व कापूर पेटो धडाडून
नुरावे निशाण इवलेही ॥५
इतुकी प्रार्थना माझी ज्ञानदेवा
तुझाच मी व्हावा माझेविना ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा