बुधवार, १२ मार्च, २०२५

माय

 
माय
****
अजात पाखरावर 
आपल्या पंखाची 
पाखर घालणारी 
माय कधी मरू नये 
प्रेमाने सौख्याने मायेने  
घर सांभाळणारे
आधार कधी मोडू नये 
या तुझ्या जगात देवा 
सुख भरपूर आहे 
घे सारे परत हवे तर पण 
बाल्य कुणाचे करपू नये 
होय मला मान्य आहे 
तुलाही मर्यादा आहेत 
जन्म मरणाचे नियम तुझे  
सारेच निष्ठूर आहेत
पण तिच्याशिवाय सांग 
आम्ही तुला कुणात पाहू रे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येणे जाणे

येणे जाणे ******* माझे असणे तुझ्या मधले कळल्याविना मजला कळले ॥१ असो थांबले असो वाहिले  वारे नभात सदैव भरले ॥२ ऋतु ऋतूत रंग वेगळे...