सांगावा
*****
चार शब्द तुझे आले चांदण्यांचेबरसले थेंब जणू अमृताचे ॥
किती आडवाटा फिरून ते आले
किती तटबंद्या मोडून ते आले ॥
शब्द कसे म्हणू तया भाषेतले
सापडले मज प्राण हरवले ॥
वठलेल्या झाडा अंकुर फुटले
आटत्या तळ्यास जीवन भेटले ॥
जरी सांगाव्यात होते न भेटणे
भेटण्याची घडी पुढे ढकलणे॥
दडलेले त्यात होतेच भेटणे
पुन्हा पुन्हा स्वप्न एक भरारणे.॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा