संत शरण
*********
जावे संताला शरण । तेच करती निदान ।।भवरोग ओळखून । करतात निवारण ।।
काय कुणाची चुकले । दोष कुठे ते मुरले ।।
नीट पाहाती कृपेने । बरे करती साधने ।।
कोण मोहाने दाटले । कुणा कामने गिळले ।।
कोण क्रोधात जळले । मद मत्सरे पिडले ।।
अति कुशल नेमके । मधु नीटसं मोजके ।।
देती पथ्य आवडते । व्याधी समूळ ती जाते ।।
विक्रांत संताचा ऋणी। दवा दिली रे बांधुनि।।
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा