मंगळवार, १ जून, २०२१

मज खुणावते
मज खुणावते 
🌸🌸🌸

नको धन मान 
नको मोठेपण 
सुख भोगी मन 
नको आता ॥

दयाळा विटलो 
सारे संभाळता 
भार  होई चित्ता 
आता सारे ॥

देई रे कफनी 
देई रे कटोरा 
सांडून पसारा 
जावे वाटे ॥

आकाशाचे छत 
मज खुणावते 
धरा ये  म्हणते 
रहायला ॥

कुठवर साहू 
अडले नकार 
एकांता होकार 
कधी देऊ ॥

येई दत्तात्रेया 
येई रे हदया 
जाणून सदया 
भाव माझा ॥

विक्रांत जगात 
परक्या घरात 
तुझं आठवत
राहतो रे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विक्रांत आवडी

विक्रांत आवडी  *********** विक्रांत आवडी  सदैव दत्ताची  राहु दे कृपेची  हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती  सुंदर नाम वा अबीर भाळाव...