गुरुवार, १ एप्रिल, २०२१

रिवाजी

रिवाजी
******

प्रीत रिवाजी 
मित रिवाजी 
रित रिवाजी 
जगाची ॥

देहा मधले 
धना मधले 
पुढे विटले 
होते रे ॥

ओढ उथळ 
जोड उथळ 
मौज केवळ 
क्षणाची॥

सुख असूनी 
धावे कामना
काय कारणा
कळेना ॥

मन अश्व तो 
का उधळतो
काय शोधतो 
न कळे  ॥

अहा जगणे 
पिसे फिरणे 
सुख पाहणे 
सर्वत्र ॥

श्रीगुरुदत्ता 
वाचव आता 
तव विक्रांता 
थकल्या ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गणेश पुजा

गणेश पुजा ******** पित फुलांचा संभार  करे कनकाची हार  देव गणेशाची पूजा  हर्ष मनात अपार ॥ किती लोभस ही मूर्ती  जडे तयावर प्रीती  ...