शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

बाप गजानन



बाप गजानन
राहतो उन्मनी
देह पांघरूनी
देहावर ॥
अति कनवाळू
त्रिकाळाचा ज्ञानी
लीलाधर मुनी
भक्त काम ॥
धावतो हाकेला
शरणागताला
अनन्य भावाला
भुकेला जो ॥
सोडा अहंकार
पडा पायावर
बाप हातावर
झेलीतो तो ॥
विक्रांत जाणतो
तत्व गुरुदत्त
तयाला मागत
आहे तेच ॥
***:
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पायवाट

पायवाट ****** हळूहळू मनात धूसर होणारी तुझी प्रतिमा  आणि शब्दांना लागलेली ओहोटी  याच्यातील सरळ संबंध नाकारत नाही मी  प्रत्येक खेळ...