गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

उखाणे

उखाणे
******


जुन्याच फोटोला 
सुखाचे उखाणे
घालून साजणे
जाऊ नको॥
उन वैशाखाचे 
तापल्या भूमीचे 
तुज सोसायचे 
नाही आता ॥
होईल काहिली 
जळेल त्वचा ही 
कशाला अशीही 
वेडी होते ॥
गेले एक तप 
जाईल अधिक 
वेचून तू  सुख 
घेई आले ॥
सोडून त्या देई
कथा कौतुकाच्या
राजा नी  राणीच्या 
आता तरी ॥
असेल शितल 
छाया नागफणी 
तया खाली कोणी 
जाती का गं ॥
असो रीतभात 
थकलेले हात 
परी डोळीयात 
दीप जाळ ॥
**
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita. blogspot.com

२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम ! विक्रांत, मग तीने पुढे काय करावे बरे? डोळ्यात दीप जाळण्याचा रस्ता काय असावा? यावर तुमचे मार्गदर्शन खुप उपयोगी ठरेल.. जरुर लिहा..

    उत्तर द्याहटवा
  2. आत्मदीप हाच खरा दीप असतो. परिस्थितीमुळे त्याभोवती कदाचित काजळी दाटून येते पण विवेकाची काडी हातात घेऊन ती काजळी हळुवारपणे काढून टाकणं आणि आत्मदीप प्रज्वलित करणे हेच खरी आपले ध्येय असते

    उत्तर द्याहटवा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...