शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

प्रीती झाला




पुन्हा तोच वार 
त्याच व्रणावर 
जन्म दुःखावर 
डाग नवा 

सुटता सुटेना 
व्यथेचा डोंगर 
जन्म पायावर 
उचलेना 

अवघी वचने 
करून भरली 
रानाने ऐकली 
मुक पणे 

आणि वाटवधे
स्नेहळ प्रेमळ 
करून घायाळ 
गेले कधी

गळे थेंब थेंब 
रक्त जन्मातून 
संपावे म्हणून 
संपेचना 


अवघा आक्रोश 
मृदुल फुलांचा 
मधूर गंधाचा 
प्रीती झाला



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

२ टिप्पण्या:

स्वीकार

स्वीकार  ******* करी रे स्वीकार माझा मायबापा आगा दयारूपा माझे म्हणा  नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती  परी उपरती खरी असे  व्यर्थ म...