बरे केलेत
**********
घातल्या गोळ्या त्यांना
बरे केलेत
खरे खोटे होते का
ते
नाही विचारत
काही लोक कधीही
नाहीच सुधारत
भय हवे पापीयांना
नव्हतेच ते घडत
-
मानवी हक्क म्हणूनी
ओरडेल कुणी
न्यायाच्या बजावणीस
होत आग्रही कुणी
पण तोवरच की
त्यांचे तिथे नसतील
कुणी
-
लेक बहिण आई
जेव्हा जळते मरुनी
यातनेत पशुच्या
जाते तडफ़डूनी
गोष्टी न्यायाच्या मग
जातात रे गळूनी
-
म्हणुनिया म्हणतो
मी
बरे केलेत
म्हणेन पुन:पुन्हा
जरी
पुन्हा केलेत
-
दिसता समोर
धडधडीत पिशाच
तया काय सिद्ध करावे
लागते ते पिशाच
नष्ट करूनी तया ती
थांबवावी पैदास
-
ततक्षणी ततक्षणी ततक्षणी
-
थोर कार्य ते नाही
अरे याहूनी
-
बरे केलेत !
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com
http://kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा