शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

दत्ता माझ्या भाळावर





दत्ता माझ्या भाळावर 
कृपेची अक्षर 
रेखाटली अपार 
दया तुझी ॥

दत्ता माझ्या जगण्यात 
दाटलेल्या काळोखात 
पेटवली फुलवात 
प्रेमे तूची

अगदीच हट्ट नव्हता 
परी तूच हवा होता 
हळूवार या चित्ता 
आलास तू ॥

सदा पायी असू दे रे 
तुझ्यासाठी जगू दे रे 
गांजल्यांना दाऊ दे रे 
तव पायवाट ॥

सुखावला विक्रांत 
दत्त आला जगण्यात 
राहे आता गाणे गात
तयाचिच मी॥

  © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोभ

लोभ ****** फुटली उकळी  गाणे आले गळा  प्रेमे उजळला  गाभारा हा ॥ १ शब्द सुमनांनी  भरले ताटवे भ्रमराचे थवे  अर्थ रुपी ॥ २ पसरला धूप...