रविवार, २२ डिसेंबर, २०१९

ढोर




ढोर
*****

भरल्या पिकात 
घुसलेली ढोर 
जाळी तोंडावर 
बांधलेली 
.
हवाव डोळ्यात 
खाण्याचा आकांत 
उदंड यत्नात 
व्यर्थ गेली
.
तैसे या जगात 
सुखाच्या शोधात 
जन धावतात 
भाग्यहीन 

पाहून यातना 
जनाच्या मनाच्या
विक्रांत दत्ताच्या 
पायी आला 

हरवली जाळी
सरले वावर 
मनाला आवर 
घालणे ही  

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एवढेच पुरे

एवढेच पुरे  ******** वेदनांची स्मृती म्हणजे असते भय  आनंदाचे स्मृती म्हणजे असते आकांक्षा  आणि ही दिसणारी अस्वस्थता  भय आणि इच्छे...