रविवार, १ डिसेंबर, २०१९

सोनेरी मासोळी




सोनेरी मासोळी
 *************

सोनेरी पाण्यात
सोनेरी मासोळी
सोनेरी झळाळी
डोळीयात

सोनेरी जिण्यात
सोनेरी गाण्यात
सोनेरी लेण्यात
मिरवती

तरी का तहान
दाटते कंठात
आकाश डोळ्यात
उतरते

जडावती पर
हरवते भान
किनाऱ्यात मन
अडकते

का ग बाई अशी 

येते काकुळती 
वैराग्याची वस्ती 
शोधू जाशी

विक्रांत मासोळी
धावे वृक्षातळी
दत्त नरहरी
असे तिथे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आळंदीत . .

आलो आळंदीत  ************ आलो आळंदीत झालो आनंदीत  देव समाधीत पाहियला  भारावले तन भारावले मन  गर्जे कणकण ज्ञानदेव  जिवलग भेटी हरपल...