शुक्रवार, १४ जून, २०१९

रेवा माय




रेवा माय
***

जगतोय दूर किनारा सोडून 
माय दूरावून तुझिया पासून 

तुझिया स्मृतीचे इवलेसे क्षण  
वेचतो त्यातून आनंदाचे कण

ये कधीतरी जा गे घेऊन
तुझ्या कुशीत मी मजला सांडीन

होईल काश भरून चांदणे 
हरित पर्णाची लेईन वसणे 

जल लहरींचे चंचल नर्तन 
अथांग डोह वा जाईन होवून

कुठल्या दारचा होईल वा ओटा
गूढ रानातील अनवट वाटा

पुन्हा एकदा हे अवघे सोडून
वाटे फक्त तुझा  जावे मी होवून 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

००००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बंद दार

बंद दार **** कधी दारे होतात बंद  दरवाजा खूप दिवस   न उघडल्या गेल्याने गंजून तर कधी केली जातात बंद  हेतू पुरस्पर  जाणून बुजून दिल...