बुधवार, ५ जून, २०१९

गिरनार पौर्णिमा



गिरनार पौर्णिमा.
*************
शुभ्र चांदण्यात
शुभ्र पायवाट
रुपे पावलात
पसरले ॥

व्यापून नभास
शुभ्र पूर्ण चंद्र
भरला आनंद
पर्णो पर्णी ॥

दूरवर कुठे
गुरूंची शिखर
पदपदावर
परी भेट .॥

भोवती लहरी
वायूच्या नाचती
जणू की सांगती
चाल पुढे ॥

घडले दर्शन
पुण्य आरतीत
दाटे अंतरात
उजेड तो ॥

कुणी दिली भेट
कळे ना कुणास
विक्रांत पूर्वेस
सूर्य झाला॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी  ***** आनंदाची वाट आनंदे भरली  कृपा ओघळली अंतरात ॥१ ज्ञानदेवी माझ्या जीवाचा विसावा  पातलो मी गावा आनंदाच्या ॥२ अर्थातल...