**********
बहुत जन्मात
तुझी आठवण
करूनिया मन
तुझे झाले ॥
पेटलेला दीप
असे अंतरात
असे अंतरात
देऊनिया हात
सांभाळी रे ॥
पुन्हा ठेव पदी
न दे हरवून
जन्म मरणातून
सोडव रे ॥
मागण्यास आता
आन काही नाही
जीवनाची वही
भरलेली ॥
भेटलास बापा
रहा सदा साथ
मागतो विक्रांत .
तुज आता ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा