मंगळवार, ४ जून, २०१९

आरसा




आरसा
******

माझिया मनाचा
आरसा धुळीचा
तुझिया हाताचा
स्पर्श मागे 

मग मी नितळ
होवून केवळ
स्वरूप सोज्वळ
मिरवीन 

अंतरी निर्मळ
प्रेमाचा प्रकाश
अनंत आकाश
होईल रे ॥ 

असा मी घडता
तुज बोलाविता
होईल अनंता
साध्य काही 

मग तू येवून
पाहा डोकावून
मजला देऊन
तुझे पण.॥



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


1 टिप्पणी:

  1. फारच सुंदर भाव
    आपल्या वर दत्त क्रुपा असावी
    आपल्या चरणी नमस्कार
    श्री गुरूदेव दत्त

    उत्तर द्याहटवा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...